नागोराव उबरहंडे -एक हाडाचे शिक्षक
नागोराव उबरहंडे सर : एक सालस व्यक्तिमत्त्व
सामान्य आणि परिस्थितीने मध्यम असलेल्या पांग्री उबरहंडे या कुटुंबात नागोराव आत्माराम उबरहंडे सरांचा पांग्री या गावी जन्म झाला. त्यांची जन्मतारीख ४ जूलै १९६९ ही असून आजरोजी त्यांनी ५५ वर्षं पूर्ण केलेली आहे. या कालावधीमध्ये त्यांनी अनेक चढउतार पाहिले असून संघर्षात जीवन व्यतीत केले आहे. नोकरी लागल्यानंतर त्यांनी गावात आणि भावबंधात कुटुंबाला शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या लौकिक प्राप्त व्हावा यासाठी आर्थिक आणि शारीरिक झीज सहन केली आहे.
पूर्वीची कुटुंबं फार मोठी होती. एकत्र कुटुंब पद्धती पूर्वापार चालत आलेली होती.नागोराव सरांचे कुटुंब त्यापैकी एक होते. पाच काका आणि आणि दोन आत्या असा त्यांचा कुटुंब विस्तार आहे.
अशाही गोतावळ्यात नागोराव उबरहंडे सरांचे प्राथमिक शिक्षण पांग्री उबरहंडे येथे तर माध्यमिक शिक्षण बुलडाणा येथे १९८६ मध्ये पूर्ण झाले. बीए डी एड हे व्यावसायिक पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांना १९९२ मध्ये शिक्षक होण्याची संधी चालून आली.
बुलडाणा पंचायत समितीमध्ये म्हसला बु|| येथे 1वर्ष , केसापूर येथे 15वर्षे, शिरपूर येथे 4 वर्षे त्यांनी प्रामाणिकपणे आणि जीव ओतून नोकरी केली. जिल्हा परिषद म्हटली की बदली ही ओघाने आलीच. पूढे खामगाव पं. स.मध्ये कवडगाव ,चिखली पं. स. साकेगाव 1वर्ष , आणि सोयगाव येथे आजरोजी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. शिवाय आजरोजी ही एक मॉडेल शाळा असून तिला ISO ट्रेडमार्क मिळालेला, ही एक अभिमानास्पद बाब आहे असे मला वाटते. सर्व शिक्षकांनी खूप परिश्रम घेतल्यामुळे या शाळेला आज हे चांगले दिवस आले आहेत.
नोकरी लागल्यानंतर एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी कुटुंबातील इतर भावांच्या मुलांना स्वतः च्या मुलांसोबत उच्च शिक्षण घेण्याची व्यवस्था करून दिली आहे.
नागोराव उबरहंडे सरांना एक मुलगा व एक मुलगी असून त्यांच्या आवडीनुसार त्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी दिली आहे. आजरोजी मुलगा बीएएमएस असून पुणे येथे दवाखाना टाकून प्रॅक्टिस करतो आहे तर मुलगी इंजिनिअरिंगची पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करते आहे.
उबरहंडे सरांचा स्वभाव संयमी, शांत,समाजाभिमुख,आणि विशेष करून निगर्वी आहे. ते आपल्या ग्रुपचे सदस्य असून कोणत्याही सामाजिक कार्यात आवर्जून भाग घेतात. वाढदिवसानिमित्त त्यांना सुख,समृद्धी, मानसिक स्वास्थ्य आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
# प्रा डी एम कानडजे,मधुकोष निवास,
सागवन-बुलडाणा.(भ्रमणध्वनी ८२७५२३१८७४)