माझे बाबा - माझी प्रेरणा " संस्कारांचा ठेवा .
पुस्तक परिक्षण :- " माझे बाबा - माझी प्रेरणा " संस्कारांचा ठेवा . प्रा. डी एस लहाने हे समाजातील एक लक्षवेधी नाव असून घटस्फोटिता, परित्यक्ता ,विधवा अशा महिलांच्या पुनर्विवाहांवर चिंतन करणारे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. यांनी समाजातील एकल महिलांसाठी पुनर्विवाह चळवळ हाती घेतली आणि या चळवळीला बरेच यश आले. त्यांनी आजपर्यंत अनेक एकल महिलांचे पुनर्विवाह लावून दिली आहेत.सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे प्रा. डी एस लहाने यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकून साहित्य क्षेत्रात प्रवेश केला आहे. प्रा. डी एस लहाने हे शिवसाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांना शैक्षणिक आणि समाजकार्याची विशेष आवड आहे. त्यांचे सहकार क्षेत्रात सुद्धा चांगले योगदान असून त्यांनी शिवसाई सहकारी पतसंस्थेचे शहरी व ग्रामीण भागात जाळे विणले आहे. एकल महिला म्हणून जीवन जगणे आणि समाजाच्या पारंपारिक धारणांना झुगारून देणे हे विधवा, परित्यक्ता आणि घटस्फोटिता महिलांना सोपे नाही. ती एक तारेवरची कसरत असते. परंतु प्रा डी एस लहाने...