दिपक चिंचोले - एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व

 कनिष्ठ अभियंता दिपक चिंचोले - एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व 

----------------------------------------------------------------------------

        बुलढाणा जिल्ह्यातील मोहाडी जवळ असलेल्या हिवरखेड गावी दिपक दगडूजी चिंचोले यांचा एका सामान्य कुटुंबात 23 ऑगस्ट 1967 रोजी जन्म झाला. त्यांचे मूळचे गाव चिखली जवळ असलेले मालगणी असून ते सध्या बुलडाणा येथे स्थायिक झाले आहे. त्यांचे वडील दगडूजी शामराव चिंचोले हे केवळ सातवा वर्ग असताना ते पोलीस विभागात नोकरीला होते. त्यांनी केलेल्या प्रामाणिक नोकरीचा मोबदला म्हणून त्यांना पदोन्नती मिळत गेली. शेवटी ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. 

      त्यांची आई इंद्रावती ही एक सामान्य कुटुंबातील चवथा वर्ग शिकलेली एक आदर्श गृहिणी होती. तिने फार मोठा प्रपंच सांभाळून सर्वांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी कष्ट केले. पोलिसांची नोकरी म्हणजे एक तारेवरची कसरत असते . केव्हाही कधीही रात्री बे रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला की हातातला घास बाजूला ठेवून ड्युटीवर जावे लागत असे. 

    त्यांना सहा भाऊ आणि एक बहीण असा त्यांचा कुटुंब विस्तार. कुटुंबांचे पालन पोषण करणे आईची फार मोठी जबाबदारी होती आणि त्या माऊलीने ती काटकसरीने संसार करून पती पोलीस खात्यात नोकरीवर असल्यामुळे त्यांना अजिबात वेळ मिळत नसल्यामुळे ती जबाबदारीने पार पाडली. अशा परिस्थितीत सर्व मुलांना आईने सांभाळून उच्च शिक्षण दिले. त्यांचे मोठे भाऊ प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले आहे. तर इतर चार भाऊ शिक्षक आहेत आणि एक भाऊ उत्कृष्ट शेती करतात.

      दिपक यांचे प्राथमिक शिक्षण अंढेरा आणि साखरखेर्डा येथे झाले. त्यांचे ८ वी व ९ वी चे किनगाव राजा व मलकापूर येथे झाले. त्यांच्या वडिलांची नोकरी पोलीसाची असल्यामुळे त्यांचे शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. शेवटी ते एकदाचे 1983 मध्ये अमर विद्यालय अमडापूर येथे प्रथम श्रेणीत दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. दहावी पास झाल्याचा आनंद त्यांचेसाठी अतिशय अवर्णनीय होता.

     पुढे उच्च शिक्षण घ्यावे अशी त्यांची खूप जिद्द होती. परंतु वडिलांच्या बदलत्या नोकरीमुळे त्यांना काय करावे सूचत नव्हते. आयटीया झाले की लगेच नोकरी मिळते हे समजले आणि म्हणून त्यांनी आयटीआय मध्ये 1983 मध्ये प्रवेश घेतला आणि ते गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेज बुलढाणा येथे 1985 साली मोटार मेकॅनिक ट्रेड मध्ये पास झाले. तसेच 1987 मध्ये त्यांनी जीटीआय हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने पूर्ण केला. व्यावसायिक शिक्षण आपल्या मुलाने घेतल्याचा आनंद त्यांच्या वडिलांना खूप आनंद झाला.

        त्यांना 1 जानेवारी 1990 रोजी बुलढाणा येथे स्थापित्यिक अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लागली. नोकरी लागली तेव्हा त्यांच्या कुटुंबाला जो काही आनंद झाला होता तो गगनात मावेनासा होता.

    पुढे त्यांनी नोकरी आणि प्रपंच सांभाळून उच्च शिक्षण घेण्याचा ध्यास घेतला. सन 2018 ते 2021 या कालावधीमध्ये ते बाह्यस्त्रोत द्वारे मणिपूर येथे सिव्हिल इंजिनिअर झाले. 

   त्यांनी एक विशेष प्रसंग सांगितला तो असा की डोंगरखंडाळा येथे 2019-20 मध्ये अतिक्रमण काढून घेत असताना तेथे असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ट्रॅक्टर मध्ये टाकल्यानंतर खाली पडला होता. तेथे गोंधळ निर्माण होऊन मारझोड, दगडफेड झाली. त्यामध्ये मी व माझे सहकारी, ड्रायव्हर आणि उपअभियंता श्री कोरडे साहेब या प्रकरणात बालंबाल वाचलो. 

      ते सार्वजनिक बांधकाम विभागात बुलढाणा, कोकणभवन मुंबई, तुर्भे , पुसद अंतर्गत उपविभाग महागांव आणि शेवटी ते सार्वजनिक बांधकाम विभाग चिखली येथून एकूण ३५ वर्ष ८ महिने सेवा करून ३१ऑगष्ट २०२५ रोजी सन्मानने सेवानिवृत्त झाले आहेत.

          कौटुंबिक जबाबदारी म्हणून त्यांनी आई वडिलांची प्रामाणिकपणे सेवा केली. कुटुंबासाठी प्रशस्त घर बांधून दिले. भावांचे शिक्षण आणि आजारपण केले. तसेच नोकरीच्या काळात ग्रामीण भागातील लोकांची सेवा करण्याची त्यांना संधी मिळाली. ग्रामीण भागातील लोकांचे पांंदन रस्ते भांडणांचे मुळ कारण होते , हे लक्षात घेऊन त्यांनी ३६९ पांदन रस्ते मंजूर केले. त्यापैकी ७० कामे पूर्ण झाली असून १३५ कामे प्रगतीपथावर आहे.

   त्यांच्या पत्नीचे नाव लता असून त्यांचा कुटुंबाच्या विकासात मोठा वाटा आहे. दिपक चिंचोले यांना दोन मुले असून मोठा मुलगा सुरज एमबीबीएस असून तो वरवंड येथे मेडिकल ऑफिसर आहे. त्याची पत्नी प्रियंका एमडी (पंचकर्म) असून बीएमएस काॅलेज बुलडाणा येथे प्राध्यापिका म्हणून काम करतात. तसेच धाकटा मुलगा अनिकेत हा एमबीबीएस असून तो बोराखेडी येथे मेडिकल ऑफिसर म्हणून काम पाहतो आहे. तसेच त्याची धर्मपत्नी शिवानी ही एमबीबीएस असून ती शेंबा येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. खरोखर या कुटुंबाचा हा उच्च शिक्षणाचा वारसा अतिशय गौरवास्पद आहे. पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्या वडिलांनी प्रामाणिकपणे नोकरी करून एक चांगली संतती सुसंस्कृत आणि उच्च विद्याविभूषित केली हे खरोखर कुटुंबासाठी आणि बहुजन समाजासाठी अभिमानाची बाब आहे असे मला वाटते.

     मालगणी गावात शासन सेवेत असतांना गावातील रस्ता, सभामंडप इ. कामे मंजूर करून पूर्ण करून घेतली. तसेच सद्यस्थितीत असलेले माझे गाव हिवरखेड या गावाचा रस्ता मंजूर करून सद्यस्थितीत काम प्रगतीपथावर आहे, असे ते सांगतात.

 सामाजिक आणि धार्मिक काम म्हणाल तर त्यांनी २१ वर्षापासून श्री संप्रदाय अंतर्गत बरीच कुटुंबे व्यसनापासून मुक्त केली आहे. तसेच जीवन जगताना कसं जगावं यावर मार्गदर्शन केले. त्यांचे गुरु रामानंदाचार्य जगद्गुरू नरेंद्राचार्य नाणीजधाम यांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने आज माझी मुलं स्वकर्तृत्वाने डॉक्टर झाली आहेत. " तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा " तसेच स्वप्नातही कुणाचे वाईट चिंतु नका या घोषवाक्याने आम्ही या संप्रदायमध्ये सुखी झालो आहोत ,तसेच इतरांना सुखी करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो.प्रसंगी मदतही करतो.असे ते सांगतात.

     तसे सप्टेंबर 2024 मध्ये चिखली येथे रक्तदानाचा कार्यक्रम घेऊन 124 कुपिका संकलन करून दिल्या आहेत . तसेच चिखली, खंडाळा , उदयनगर व तोरणवाडा रस्त्यावर शासनामार्फत 6000 झाडे लावून जतन केली आणि ती वाढविली. जानेवारी 2025 मध्ये त्यांना उत्कृष्ट अधिकारी म्हणून अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला येथील मा. श्री अविनाश धोंडगे यांनी प्रशास्तीपत्र देऊन सन्मानित केले.

       मी आणि चिंचोले साहेब एंडोले सरांच्या घरात शेजारी भाड्याने राहत होतो. शिकत असताना ते हाताने स्वयंपाक करायचे. शेजारी भाड्याने राहत असल्याने ते बऱ्याच वेळा मला स्वयंपाक आणून देत असे. दुसऱ्या विषयी असलेला जिव्हाळा यात दिसून येतो. स्वामी नरेंद्र महाराजाचे ते पूर्वीपासून शिष्य आहेत. हिवरखेड आणि मोहाडी या गावांचे केवळ तीन किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे आमचे बऱ्याच वर्षांपासून घनिष्ठ संबंध आहे. २०२४ साली कश्मिरला ते सहकुटुंब माझ्या सोबत तीर्थयात्रेसाठी होते. ते कुटुंब सहकार्यशील असून परखड वृत्तीचे आणि स्पष्ट वक्ते आहे. त्यांचा स्वभाव संयमी, शांत ,निगर्वी आणि सहकार्यवृतीचा आणि प्रेमळ आहे.

#  प्रा डी एम कानडजे 

 

Popular posts from this blog

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

प्रा.जगदेवराव बाहेकर: एक सर्वस्पर्शी बहुआयामी व्यक्तिमत्त्व

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व