कृतिशील समाजसेवक -पंढरीनाथ पाटील
कृतिशील समाजसेवक - शिक्षणमहर्षी पंढरीनाथ पाटील ---------------------------------------------------------------------- विदर्भात अनेक रत्ने जन्माला जन्म आलीत. दलितमित्र समाजभूषण पंढरीनाथ पाटील हे त्यापैकी एक होत. पंढरीनाथ पाटील यांचा जन्म २० सप्टेंबर १९०३ रोजी खामगाव तालुक्यातील अंबोडा या लहानशा खेड्यात झाला. सिताराम पाटील आणि आई राधाबाई या वारकरी संप्रदायाच्या विचारसरणीत पंढरीनाथ पाटलांचे बालपण गेले. विसाव्या शतकात सर्वप्रथम समाजसुधारणेची मुहूर्तमेढ रोवणारे ते एक कुटुंब होते. पंढरीनाथ पाटील यांचे आजोबा गंभीरजी पाटील हे खर्चिक आणि उदार स्वभावाचे आणि कट्टर पुरोगामी विचारसरणीचे होते. ग्रामीण लोकं अनिष्ट रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा यात जखडून गेली होती. ब्रिटिश राजवटीत अज्ञान, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव, कर्मकांड ,उच्चवर्णीयांची मक्तेदारी् यांचे विरुद्ध संघर्ष करणे सापे नव्हते. विसाव्या शतकात सामाजिक बंड करून समाजसुधारणेची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्...